चंद्रपूर:- अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक १३ फेब्रुवारीला सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास नागपूर रोड पडोली सैनिक पेट्रोल पंपाजवळ घडली. ज्ञानेश्वर मारोतराव भादंक्कर (७८) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, ज्ञानेश्वर भादंक्कर चौकीदार असल्याने ते सायंकाळी आपल्या कामावर जात असतांना नागपूर रोड पडोली सैनिक पेट्रोल पंपाजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत ज्ञानेश्वर भादंक्कर यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.