Top News

विद्यार्थ्यांनी साजरा केला मातृपितृदिन #chandrapur #Rajura


विविध स्पर्धांचे आयोजन; आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिरचा उपक्रम


राजुरा:- आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथे १४ फेब्रुवारीला मातृ-पितृदिन साजरा करण्यात आला. शाळेच्या सहायक शिक्षिका सोनल नक्षिणे, गेडेकर, दरेकर यांनी विद्यार्थ्यांना मातृपितृ पूजन कसे करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भास्करराव येसेकर, मुख्याध्यापक दिपक सातपुते, वैशाली बोबडे, वनिता ढवस, सुवर्णा आस्वले यांची उपस्थिती होती. संचालन सहायक शिक्षक बंडू बोढे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपक सातपुते, तर आभार सहायक शिक्षक दिपक मडावी यांनी मानले.
यादरम्यान विविध स्पर्धाही पार पडल्या. पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वैशाली बोबडे, द्वितीय क्रमांक लक्ष्मी लाटेलवार व तृतीय क्रमांक सुरेखा लटपटे यांनी पटकाविला. वन मिनिट शो मध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी लाटेलवार, द्वितीय क्रमांक रोशनी हलदर व तृतीय क्रमांक शुभांगी चेडे यांनी प्राप्त केला. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने