Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

विनापरवाना रेती वाहतूक; दोन हायवा जप्त #chandrapur #ballarpur


बल्लारपूर:- विनापरवाना रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन हायवा बल्लारपूर तहसीलच्या पथकांनी जप्त केल्याची कारवाई गुरुवारी मध्यरात्री मानोरा व कारवा रस्त्यावर केली. या कारवाईने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

तहसील कार्यालयाचे पथक तालुक्यामध्ये होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर लक्ष ठेवून आहेत. हे पथक गुरुवारी रात्री गस्तीवर असताना मारोती खणके याचा हायवा ट्रक क्र. एम एच ३४ एम. ९३७० व स्वप्नील काशीकर याचा हायवा ट्रक क्र. एम. एच-३४-एबी-१०५५ याद्वारे रेतीची विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे तपासणीत समोर आले. त्यामुळे तहसीलच्या पथकाने दोन्ही वाहन जप्त केले. ही कारवाई परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार स्नेहल रहाटे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार रामेश्वर बिडवई (परि), तलाठी महादेव कनाके, वाहन चालक सिद्धार्थ वनकर आदींनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत