Top News

घरफोडीच्या दोन अट्टल गुन्हेगारांसह मुद्देमाल जप्त chandrapur #LCB


स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


चंद्रपूर:- मागील काही दिवसापासुन चंद्रपुर शहरात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने अशा गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. या निर्देशानुसार पोलीस निरिक्षक महेश कोंडावार स्था. गु. शा चंद्रपुर यांनी चंद्रपूर शहरातील घरफोडीचे गुन्हे दाखल असणारे अल्पवयीन गुन्हेगार यांचे हालचालीवर लक्ष ठेवूण माहीती काढण्यास सांगूण एक विशेष पथक नेमुन त्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक दिवसांपासुन सापळा रचला.

दि. 17/02/23 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोस्टे चंद्रपूर शहर रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार नामे 1) मुजाहीद उर्फ मुज्जु आहत शेख वय 23 वर्ष 2 ) शहबाज उर्फ गोलु सादीक शेख वय 21 वर्ष दोन्ही रा. जलनगर वार्ड माता मंदीर जवळ चंद्रपूर हे जिल्हा कारागृहा जवळील सराफा लाईन कोतवाली वार्ड चंद्रपूर परिसरात आपले खिशात बिना कागदपत्राचे सोन्याचे दागिने विकी करण्याकरीता संशयास्पद स्थितीत फिरत आहे. अशा माहीती वरूण पोस्टाफ चे मदतीने सापळा रचून वरील दोन्ही आरोपीना ताब्यात घेवूण त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कडूण सोन्याचे दागिने एकूण वजन 39.830 ग्रॅम व एक मोबाईल असा एकूण 1,82,297 /- रू. चा माल जप्त करण्यात आला.

सदर आरोपीनी 7 महीने अगोदर पो.स्टे. चंद्रपूर शहरातील घुटकाला वार्ड चंद्रपूर परिसरातील रात्रौ दरम्यान बंद घराचा ताला तोडून आत प्रवेश करूण आलमारीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगितले. त्यांचे सोबत त्यांचा साथीदार तनवीर रोशन शेख हा सुध्दा असून त्याचे कडे उर्वरीत घरफोडीतील चोरलेले दागिने असून तो फरार आहे. त्यासंबंधी पोस्टे. चंद्रपूर शहर येथे दाखल असलेला अप. कं 437/22 कलम 457, 380 भादवीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. यातील नमूद आरोपीवर यापूर्वी नाबालीक असताना घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहे.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, पो. हवा. संजय आतकुलवार, नईम खान पठाण व पो.अ. प्रांजल झिलपे, नरेश डाहुले, चापोहवा. प्रमोद डंभारे यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने