चंद्रपूर जिल्ह्याच्या जंगलातील कोंबडा बाजारावर धाड #chandrapur #Bhadrawati

Bhairav Diwase

७ लक्ष ५३ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त


भद्रावती:- तालुक्यातील तिरवंजा जंगलात सुरु असलेल्या कोंबडा बाजारावर पोलिसांनी धाड टाकुन ७ लक्ष ५३ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर चौदा आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. हि कारवाई भद्रावती पोलिसांकडून करण्यात आली.

भद्रावती तालुक्यातील तिरवंजा जंगलात कोंबडा बाजार सुरु असल्याची गोपणीय माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी लगेच आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले असता तेथे कोंबडबाजार सुरु असल्याचे आढळून आले.

या बाजारावर पोलिसांनी धाड टाकुन केलेल्या कारवाईत नव जिवंत कोंबडे,बारा वाहने, धारदार लोखंडी वस्तू असा एकुण ७ लक्ष ५३ हजार ६३० रुपयांचा जप्त केला. या घटनेत सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तर अन्य १४ आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. कोंबड्यांच्या शर्यतीवर मोठा जुगार खेळला जातो. मात्र भद्रावती तालुक्यात टाकण्यात आलेल्या धाडीमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास ठाणेदार बिपीन यांच्या नेतृत्वात सूरू आहे.