Click Here...👇👇👇

सिनेट सदस्यांच्या मागणीला यश #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase


चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्यांच्या मागणीला यश आले असून एम.बी.ए. तृतीय सत्र च्या पुनर्मुल्यांनाची तारिख वाढली आहे.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या एम.बी.ए. तृतीय सत्र च्या परिक्षेचा निकाल 3 फेब्रुवारी 2023 रोजी घोषित करण्यात आला होता.

त्यानुसार पुनर्मुल्यांनाकरिता अंतिम तारीख 13 फेब्रुवारी 2023 विद्यापीठाने दिली होती. परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे सिनेट सदस्य गुरूदास कामडी, यश बांगडे, प्रशांत दोंतुलवार, किरण गजपुरे, धर्मेंद्र मुनघाटे यांनी गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाला पुनर्मुल्यांनाची तारिख वाढविण्याची मागणी केली होती. अखेर विद्यापीठाने 15 फेब्रुवारी 2023 रोजी परिपत्रक काढून पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करण्याकरिता 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.