दीक्षाभूमीवर रविवारी बौद्ध धम्म परिषद व दीक्षा सोहळा #chandrapur


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू उपस्थित राहणार


चंद्रपूर:- भारतीय बौद्ध महासभाद्वा येथील पवित्र दीक्षाभूमीवर दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता बौद्ध धम्म परिषद व धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर उपस्थित राहतील.

परिषदेला स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर राहतील. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष नेताजी भरणे राहतील. यानंतर विविध विषयावरील मार्गदर्शनपर दोन सत्र होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय सचिव वसंत पराड, राष्ट्रीय संघटक एम.डी. सरोदे, राष्ट्रीय सचिव बी.एम. कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष जयसेन बौद्ध व जगदीश गवई मार्गदर्शन करतील.

दुसऱ्या सत्रात दी बुद्धीस्ट सोयायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, चेअरमन डॉ. हरिष रावलिया, राष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रवीण निखाडे, राष्ट्रीय महासचिव शंकरराव ढेंगरे मार्गदर्शन करतील. यानंतर धम्मदीक्षा सोहळा होईल. यामध्ये डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते धम्मदीक्षा दिली जाईल. यानंतर उपासिका प्रशिक्षण शिबिर होईल, अशी माहिती देत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या