Click Here...👇👇👇

वनस्पतीशास्त्र विभागातर्फे बॉटनिकल असोसिएशनचे उद्घाटन #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase


पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे वनस्पतीशास्त्र विभागातर्फे बॉटनिकल असोसिएशनचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख नेताजी सुभाषचंद्र सायन्स महाविद्याल मुलचेरा डॉ. शिवप्रसाद हरी यांनी जलसंवर्धन कशाप्रकारे करावे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले‌.


कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रदीप बारामते मंडळ कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना व शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करताना घ्यायची काळजी यावर मार्गदर्शन केले. एस. गेडाम सहाय्यक तांत्रिक कृषी अधिकारी पोंभूर्णा यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज यावर मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश पिसे ग्रंथपाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख उपस्थिती डॉ .अनंत देशपांडे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख हे होते. कार्यक्रमाचे आयोजक डॉ. सुप्रिया वाघमारे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख बॉटनिकल असोसिएशन 2022-23 स्थापन केली व त्याचे उद्देश विद्यार्थ्यांना सांगितले.

अध्यक्षपदी कार्तिक भुरसे बीएससी तृतीय वर्ष यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कुमारी अवंती मानकर तर आभार काजल मंकीवार हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.