Top News

काय सांगता...! मास्टर कोर्सचे चक्क ९०% विद्यार्थी नापास! #Chandrapur #gadchiroli


चंद्रपूर:- नुकतीच विद्यापीठाची हिवाळी २०२२ ची परीक्षा पार पडली यात MBA डिपार्टमेंट चे ३ महाविद्यालय मिळून ६०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

1.Sau.Leena kishor mamidwar institute of research management chandrapur.

2.Renainance Group of research and management chandrapur.

3.Ballarpur Institute of Technology (BIT)

याचा निकाल ३ फेब्रुवारी रोजी लागला, परंतु निकाल बघून सर्व विद्यार्थी हैराण झाले. विद्यापीठाने पुन्हा एकदा भोंगळ कारभार करुन निष्काळजीपणे पेपर चेकिंग केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. यामुळेच सर्व विद्यार्थी नापास झाले असे म्हंटल्या जात आहे. यासंबंधी काल सर्व विद्यार्थी मिळून सुमारे १५०-२०० ईमेल विद्यापीठाला पाठविण्यात आले. त्यामुळे आज दि.६/२/२३ रोजी सकाळी ११.३० वाजता सर्व विद्यार्थ्याना विद्यापीठातर्फे ऑनलाइन मीटिंग चे मेल आले. त्या नंतर सर्व विद्यार्थी व विद्यापीठाचे कुलगुरू व काही प्रमुख सदस्य यांची मीटिंग पार पडली. 
यात विद्यार्थ्यानी आपले मुद्दे मांडले त्यात प्रामुख्याने

१) निष्काळजीपणे पेपर चेकिंग झाल्यामुळे सर्व पेपर विना शुल्क Re-Checking करण्यात यावे.

२) Answer पेपर ची soft copy विद्यार्थ्यांना निशुल्क देण्यात यावे.

३) विद्यापीठ द्वारे सूचित केलेल्या re-checking ची अंतिम तारीख व 4th सेमेस्टर च्या तारखेवर सध्या प्रतिबंध लावण्यात यावे.

अशे ३ मुद्दे ठेवण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यानी आपल्या महाविद्यालय मधे जाऊन प्राचार्य यांना या संबंधी निवेदन देउन आमची मदत करावी अशी मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने