विद्युत शॉक लागून वाघाचा मृत्यू #tiger #pombhurna #chandrapur #tigerdeath

Bhairav Diwase


पोंभुर्णा:- पोंभूर्णा वन परिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात आज सोमवारी एका पट्टेदार वाघाचा मृत्यू विद्युत शॉक लागून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.

पोंभूर्णा वनक्षेत्र अंतर्गत व मूल तालुक्यातील नांदगाव शेतशिवारात आज सोमवारी सकाळी वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाला मिळाली. नांदगाव येथील अंकुश पुणेश नाहागमकर यांच्या शेतात वाघ मृतावस्थेत आढळून आला. वनाधिकाऱ्यांनी तत्काळ घटनस्थळी येऊन शहनिशा केली. वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी फनींद्र गादेवार करीत असून डॉक्टरांच्या चमूने वाघाचे शवविच्छेदन केले असून शवविच्छेदन अहवाल अप्राप्त आहे.