पैशासाठी बहिणीला त्रास देणाऱ्या भाऊजीचा खून #chandrapur

Bhairav Diwase
0


भद्रावती:- तिरवंजा येथे दोन लाख रुपयांची मागणी करत बहिणीला त्रास देणाऱ्या भाऊजीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. लोखंडी रॉडने डोके व हातापायाला बेदम मारहाण करून निर्घुण खून केल्याची ही घटना शनिवारी (दि. ४) सायंकाळी घडली. भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत ही परिसरात ही घटना घडली आहे. दयाल यादव रायपूरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर गंगाधर चूनारकर असे आरोपीचे नाव आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, मृत व्यक्ती दयाल यादव रायपूरे हा आरोपी गंगाधर याच्‍या बहिणीचा पती होता. दोघेही भद्रावती तालुक्यातील तिरवंजा येथे राहत होते. दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद होत होते. दयाल हा पत्‍नीकडे पैश्यासाठी नेहमी तगादा लावत होते. वारंवार पत्नीला मारहाण देखील करीत होता. घटनेच्या आदल्या दिवशी मृतकाने पैश्यासाठी पत्नीला मारहाण करत घराबाहेर काढले. यानंतर दयालची पत्‍नी भाऊ गंगाधर चूनारकर याच्या घरी आली.

शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मृत दयाल रायपूरे हा आरोपीच्या घराशेजारी आला होता. यावेळी शेजारी दिपक साव यांना शिवीगाळ करीत होता. गंगाधर याने मध्यस्थी केली, तरीही दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. गंगाधर याने लोखंडी रॉडने दयाल रायपूरे याला मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सायंकाळी पचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी गंगाधर चूनारकर याला अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)