आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय तिसऱ्या स्थानावर #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने कांस्यपदक पटकाविले. प्रथम स्थानावर राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविद्यालय विसापूर, दुसऱ्या स्थानावर आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा तर तिसऱ्या स्थानावर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर होते. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. 

       स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयच चंद्रपूर मुलींनी चिंतामणी विज्ञान महाविद्यालयाला पराभूत करून विद्यापीठाचे कांस्यपदक पटकाविले.

 मुलींमध्ये विजयश्री खेचून आणण्याकरिता जया कत्रोजवार, राजश्री पचारे, मोनिका गराड, सीमा भडके, पुजा आसेकर, अवणी रागीट, किरण दुर्गे,  यांनी आपल्या सुरेख खेळाचे व कला कौशल्याचे प्रदर्शन केले. विजेता संघात आरती यादव, नुरसबा सिद्दीकी, किर्तना इदगुलवार, निकिता गौरकार, मिना कृष्णपल्लीवार यांचा समावेश होता.

संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावार, शा. शि. विभाग प्रमुख डॉ. विजय ए. सोमकुंवर, डॉ. कुलदीप आर गोंड, हनुमंतु डबारे, चेतन इदगुरवार तसेच प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.