Top News

द्विवेणी नदीच्या तीरावर महाशिवरात्री महापुजा व यात्रा उत्सव #chandrapur #pombhurna #Gagangiri


आराध्याची भक्ती व स्नानासाठी हजारो भाविकांची उसळणार गर्दी

ऐतिहासिक देवटेकडीच्या पायथ्याशी आहे गगनगिरीचे मंदिर


पोंभूर्णा :- तालुक्यातील अंधारी व उमा नदिचा संगम असलेल्या द्विवेणी जामखुर्द देवटेकडीवर भोलेनाथाचं मंदिर आहे. पायथ्याशी स्वामी जल तपस्वी दत्त गगनगिरी देवस्थान व हनुमान मंदिर असून येथे दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीची महापूजा व यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


 द्विवेणी नदीतिर्थक्षेत्र काठावर वसलेल्या देवस्थानाला भक्तगण मोठ्या प्रमाणात येत असतात. येथे काऱ्यारूकाच्या झाडांने वेढलेल्या देवटेकडीवर शिवशंभूचे जुने मंदिर आहे.या भागातील अनेकांचे हे श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. यावर्षी द्विवेणीवर तीन दिवसाची महाशिवरात्रीची यात्रा भरणार असून याची जय्यत तयारी देवस्थान कमेटीने सुरू केली आहे. यात्रेपुर्वीच येथे भाविकांची वर्दळ सुरू झाली असून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक,भक्त या ठिकाणी भेट देत आहेत.


 अंधारी व उमा नदीच्या द्विवेणी संगमाच्या नदिकाठावर हनुमानाचे मंदिर असून देवटेकडीवर जुने शिवमंदिर आहे येथे आदिवासी मडावी राजा दर्शनासाठी येत असल्याचे येथील जुने लोकं सांगतात. त्याचा संबंध वैरागड व घाटकुडशी असल्याचे सांगतात. येथे देवटेकडीवर आदिवासी राजा धर्म परिषद भरवित असायचा. या ठिकाणी आदिवासी समाज आजही मोठ्या संख्येने जमा होवून शंभुशेक व माता जंगोमाताची पुजा अर्चा करतात.

अंधारी व उमा नदिचे संगम असलेले द्विवेणी तिर्थक्षेत्राच्या परिसरात नदि दुथडी भरून वाहत असली तरी त्याच्याने गगनगिरी मंदिराला कुठलीही नुकसान होत नाही. शेकडो वर्षांपासून येथे महाशिवरात्रीला यात्रा भरत आहे. द्विवेणी नदिच्या संगमावर असलेल्या निसर्गरम्य परिसराचा वनपर्यटन तिर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. सध्या या परिसराची देखभाल जामखुर्द वनसमिती करीत आहे. देवटेकडीवर मौल्यवान असलेल्या काऱ्यारुकाचे झाडं मोठ्या प्रमाणात आहेत.  ते तालुक्यात इतरेतर कुठेच पाहायला मिळत नाहीत. या परिसराचा वनपर्यटन तिर्थक्षेत्र म्हणून विकास झाल्यास मौल्यवान काऱ्यारुकाच्या झाडांचे संवर्धन होऊ शकते. परिसराचा विकास झाल्यास भाविक व पर्यटकांना होणारा त्रास होणार नाही.येथे धर्मशाळा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी प्रशासनाने तातडीने करण्याची मागणी यावेळी भाविकांनी केली आहे. 

द्विवेणी देवटेकडीवर जुने शिवमंदिर आहे तसेच पायथ्याशी जलतपस्वी दत्त गगनगिरी महाराजाचे मंदिर असून या परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.हे ऐतिहासिक स्थळ आहे. आदिवासी समाजाची या परिसरात ऐतिहासिक धरोहर आहे. परिसराचा विकास झाल्यास येथील धार्मिक व पर्यटनाला अधिक महत्त्व येईल. धनराज बुरांडे, सरपंच 
ग्रामपंचायत जामखुर्द

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने