मुलगा हरवल्याची तक्रार करायला गेलेल्या पालकांना कळाले की मुलाने आत्महत्या केली #chandrapur #Nagpur

Bhairav Diwase
0


नागपूर:- यश माने हा विद्यार्थी बुधवारी रात्री घरातून निघून गेला. त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांनी आणि मित्रांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. पण तो कुठेही सापडला नाही.

अखेर यशचे कुटुंबीय यश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी मानकापूर पोलिस ठाण्यात गेले. तेव्हा एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती मनकापूर पोलिसांना समजली. त्यानंतर यशच्या कुटुंबातील काहींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह यशचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

यशच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)