Top News

दारूसाठी नातवांन आजीचा कानच तोडला #chandrapur


कानातील सोन्याची बिरी पळविली


चंद्रपूर:- दारूची तलब आली अन् दारू मिळाली नाही तर तळीराम कुठल्या स्तरावर जातोय याच्या प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात आला. दारू प्यायला पैसे नसल्यान नातवान आजीकड पैशाचा तगादा लावला. आजीन पैसे देण्यास नकार दिला. आजीच्या कानात असलेल्या सोन्याच्या ब नातवाचं लक्ष गेलं. ती बीरी काढण्यासाठी नातवान आजीचा कानच तोडला. ही घटना वर्षभरापूर्वी गोंडपिप lरी तालुक्यात येणाऱ्या अळेगावात घडली. या प्रकरणी गोंडपिपरी न्यायालयान नुकताच निकाल दिला. न्यायालयान नातवला दोन वर्षाची शिक्षा आणि पाच हजाराचा दंड ठोठावला आहे. राहुल देठे असं नातवाचं नाव आहे.

राहूल देठे ( वय 35 ) हा गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील रहिवाशी आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. आधीच दारू पिऊन असतांना पुन्हा त्याला दारू पिण्याची तलब आली. पण खिशात पैसे नव्हते. अशावेळी तो आपली आजी बुधाबाई रायपुरे ( वय 80 ) यांच्या घरी गेला. दारूसाठी पैशाची मागणी केली. पण पैसे देण्यास आजीन नकार दिला. यामूळ संतापलेल्या राहूलने जबरजस्तीने आजीच्या कानातील सोन्याची बिरी काढली व पळ काढला या घटनेत आजीचा कानच तुटला व गंभीर जखमा झाल्या.

मागील वर्षी हा प्रकार घडला होता. आजीन या प्रकाराची तक्रार गोंडपिपरी पोलीसात दाखल केली. पोलीसांनी कलम 327 अन्वये राहूलवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गोंडपिपरीच्या न्यायालयाने नूकताच निकाल दिला. आरोपी राहूलला दोन वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपयाचा दंड ठोठावला सरकारी वकील म्हणून अँड.राजेश धात्रक यांनी कामकाज सांभाळले.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. मात्र दारूबंदीतही गोंडपिपरी तालुक्यात दारूचा महापूर सुरूच होता. मोठी किंमत अदा करून तळीराम आपली तहान भागवीत होते. आता दारू सुरू झाली आहे. अल्प दरात दारू मिळतेय. मात्र दारूबंदी उठल्यानंतरही असे प्रकार घडत असल्यान चिंता व्यक्त केली जात आहे. गोंडपिपरी तालुक्यात व्यसनमुक्ती संघटनाच काम जोरात सुरू असल तरी, दारूच्या व्यसनाच्या आहारी अनेक तरुण गेल्याचं धक्कादायक चित्र आहे. दारू, गांजा यांचं व्यसन लागलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. अशात न्यायालयान दिलेली ही शिक्षा तळीरामांना विचार करण्यासाठी लागणारी ठरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने