राष्ट्रीय सेवा योजना मध्ये कार्य करत असताना व्यक्तिमत्व विकास होते:- यश बांगडे #chandrapur #pombhurna #NSS


राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न


पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उद्घाटन समारंभ दत्तक ग्राम आष्टा येथे प्राचार्य डॉ. मधुकर नक्षीने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देत असते. राष्ट्रीय सेवा योजना मध्ये कार्य करत असताना व्यक्तिमत्व विकास होत असतो तसेच स्वयंसेवकांची वेगळी ओळख निर्माण होते असे कार्यक्रमाचे उद्घाटक यश बांगडे अधिसभा सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी सांगितले व कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

प्रमुख पाहुणे डॉ. शीला नरवाडे अधिसभा सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ज्या संधी उपलब्ध होतात त्याचं सोन करावे तसेच कोरोना कालावधी नंतर पुन्हा नव्याने सुरुवात करावी व समाज सेवेचा वसा पुढे नेत जावे असे प्रतिपादन केले. दरवर्षी प्रमाणे जल संवर्धन कार्यासाठी करत असलेला उपक्रम यावर्षी सुद्धा राबवावा तसेच यासाठी पूर्ण सहकार्य गावकरी करतील असे आश्वासन सरपंच किरण डाखरे यांनी दिले. माजी सरपंच मा. श्री. हरीश ढवस यांनी ग्राम स्वछतेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गेली पाच वर्षापासून भरपूर कार्य केले आहे व यावर्षी सुद्धा गावकऱ्यांसमोर स्वच्छतेचा आदर्श प्रस्थापित करावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर नक्षीने यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचे दान हे समाजासाठी करावे व गावातील गावकरी, छोटे दुकानदार, महिला बचत गट व पुरुष बचत गट यांना व्यवसायाची पुस्तके लिहून ठेवण्यासाठी सुशिक्षित करावे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे आयोजक डॉ. संघपाल नारनवरे यांनी शिबिरादरम्यान कारवायाच्या कार्याची रुपरेषा सर्वांना सांगितली व शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. पूर्णिमा मेश्राम यांनी केले तर आभार प्रा. नितीन उपर्वट यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत