बिबट्या आणि वाघाची झुंज; बिबट्या ठार #chandrapur #sindewahi #tiger #Leopard

Bhairav Diwase
0


सिंदेवाही:- वाघ व बिबट्या यांच्यात झालेल्या मध्ये झुंजेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मरेगाव बिटात उघडकीस आली आहे. वाघ व बिबट्याची झुंज सोमवारी दि.२० फेब्रुवारीला रात्री झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. वनाधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर मृतदेहाला अग्निदिली आहे.

🌄
सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील मरेगाव बिटातील कक्ष क्रमांक २७६ मध्ये संरक्षित जंगल खैरी, पवनपार येथून १ कि.मी. अंतरावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. आज सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. वनाधिकारी यांना माहिती मिळताच वनविभागचे अधिकारी मरेगाव बिटात घटनास्थळी दाखल झाली. यावेळी बिबट्या मृतावस्थेत होता. त्याच्या शरीरावर मोठमेाठ्या जखमा आढळून आल्या. मृतावस्थेतील बिबट्याच्या शरीरावरील जखमावरून त्यांचा पट्टेदार वाघाससोबत झुंज होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज पंचनामा केल्यांनतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
🌄

दि.२० फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास वाघ व बिबट्या यांच्या झुंज होऊन बिबट्या जागीच ठार झाला असावा, असाही कयास आहे. घटनास्थही सहाय्य्क उपवनसंरक्षक चोपडे, वनपरीक्षेत्र अधिकारी सालकर, क्षेत्रसहाय्यक बुरांडे,वनरक्षक व्ही. बी. सोरते, येरमे, राठोड यांच्या उपस्थितीत पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला.
🌄

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)