मार्गात गेलेल्या जमिनीच्या मोबदला अद्यापही मिळालेला नाही
महिनाभरापासून काम बंद
चंद्रपूर:- प्रस्तावित महाराष्ट्र - तेलंगणा राज्यमार्गाच काम सुरू आहे. या मार्गात गेलेल्या शेत जमिनीच्या मोबदला शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मार्गाच काम बंद पाडलं. त्वरित मोबदला न मिळाल्यास मोठ आंदोलन करण्याच्या इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
मागील महिनाभरापासून या मार्गातील सकमुर- वेदगाव दरम्यानच काम बंद आहे.सन 1972 पूर्वी धाबा-पोडसा या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली. मार्गालगत असलेल्या शेतजमिनी मार्गात गेल्या. जमिनीचा मोबदला देऊ असं प्रशासनानं सांगितलं. मात्र पन्नास वर्ष उलटले तरी मोबदल्याच्या नावावर शेतकऱ्यांचे हात रिकामेच आहे. जमिनीचा मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयात चकरा मारल्या. आमदार,खासदार मंत्र्यांना निवेदन दिली. मात्र फाईलवर साचलेली साधी धूळही उडालेली नाही. आता नव्याने धाबा-पोडसा या मार्गाचे काम सुरु झालंय. पहिल्यांदा आमच्या जमिनीचा मोबदला द्या, मगच कामाला सुरुवात करा, अशी कठोर भूमिका घेत शेतकर्यांनी रस्त्याचं काम बंद पाडलं. जोपर्यंत मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत काम करु देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
आंदोलनात आदराव काळे,श्यामराव खर्डीवार, पोचन्ना खर्डीवार, राजन्ना जक्कुलवार, मल्लया मुत्तमवार,पुंडलिक काळे,विकास लिंगे,गजानन जकुलवर, आदाबाई पेरगुरावर,गुरुदास खर्डीवार, राजेश झाडे, वासुदेव वाकुडकर, मंगेश काळे यांनी सहभाग घेतला होता.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत