'बुलेटची' हौस दुचाकीस्वारांना पडली महागात #chandrapur


सायलेंसर आणि नंबरप्लेटही केल्या जप्त


चंद्रपूर:- बुलेटला कर्णकर्कश हार्न बसवून मोठ्या प्रमाणात आवाज काढणाऱ्या बुलेटराजांवर चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून आता कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कारवाई दरम्यानच त्यांचे कर्णकर्कश आवाज काढणारे सायलेंसर, मॉडीफाय केलेले नंबरप्लेटही काढण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांत पाच बुलेटराजांवर कारवाई करत प्रत्येकी 12 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे बुलेटराजांचे धाबे दणाणले असून चंद्रपूरातील बुलेटप्रेमींवर आता भीतीचे वातावरण पसरले आहे. तरुणांमध्ये कर्कश्श दुचाकी वाहनांचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. विशेष पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी पथक तैनात करण्यात आली आहेत.

दुचाकीच्या या आवाजामुळे शाळा, महाविद्यालय परिसरातही मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार फिरत असतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, रुग्णालय परिसरातील विद्यार्थी आणि रुग्णांना याचा त्रास होत असतो. या कारवाईमुळे आता जोरदार आवाज करत फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर आता चाप बसणार आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या या कारवाईमुळे आता दुचाकीबरोबरच वाहनाबाबत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत