Top News

अख्खे घर हादरले.... पण तो स्फोट कशाचा? #chandrapur?


जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी केली पाहणी


चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील दादमहाल वार्डातील सुनीता कवडू गावंडे यांचे घरी मंगळवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाल्याने अख्खे घर हादरले. यात गावंडे परिवारचे लाखोंचे नुकसान झाले. आवाज इतका मोठा होताकी लोकांनी एकच गर्दी केली, आणि घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याची चर्चा शहरात पसरली. जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन गॅस वितरकाला पाचारण केले.परंतु तेथे असलेले गॅस सिलेंडर योग्य स्थितीत असल्याने नेमका तो स्फोट कशाचा? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या घटनेत सविता गावंडे यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले.

सुनीता गावंडे यांचे चिरंजीव आकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 महिन्यापूर्वीच गावंडे परिवार नवीन वास्तूमध्ये रहायला आले. मंगळवारी स्वयंपाक आटोपून त्यांची आई पूजेला बसली होती.त्याचवेळी जोरदार स्फोट झाला. यात खिडक्यांचे पल्ले व मुख्य द्वार छिन्नविच्छिन्न झाले.प्रवेशद्वार काळे होऊन खाली पडले तर मॉड्युलर किचन नष्ट झाले. आई सुनीताही देखील बेशुद्ध झाली.स्फोट होताच लोकांनी धाव घेतली परंतु तो पर्यंत स्फोटाने चमत्कार दाखविला होता. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही.


सिलेंडर ओके, सारे आश्चर्यचकित

घटनेची माहिती कळताच भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे व युवामोर्चा जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी काही पदाधिकाऱ्याना सोबत घेऊन गावंडे परिवाराची भेट घेत जिल्हाधिकाऱ्यांना पाचारण केले. याचवेळी खांडरे गॅस एजन्सीचे संचालक विशाल खांडरे यांना पाचारण करण्यात आले. आणि रीतसर पंचनामा करण्यात आला. गावंडे परिवाराला नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.

एच. पी. गॅस विक्री अधिकारी बुधवारी करणार पाहणी

या संदर्भात खांडरे गॅस एजन्सीचे संचालक विशाल खांडरे यांचेशी चर्चा केली असता ते म्हणाले,गॅस सिलेंडर सुयोग्य स्थितीतच होता.सिलेंडर ब्लास्ट झाला नाही.तरीही झालेली घटना नाकारता येत नाही.सिलेंडर लिक देखील झाला नाही.सर्वांना आश्चर्यचकित करणारी ही घटना आहे.प्रवेशद्वार चुरा चुरा झाले व खिडकीच्या काचा फुटल्या,इतका दाब कशामूळे निर्माण झाला असावा हा,संशोधनाचा भाग आहे.त्याची तपासणी व चौकशी करण्यासाठी बुधवारी विक्री अधिकारिसह एच पी गॅसचे अधिकारी पाहणी करणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने