नागपूर:- कोळसा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने बँकेतून काढलेली ९ लाखांची रक्कम लकडगंजमध्ये दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी पळवली. सोमवारी भरदुपारी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसा व्यापारी नर्मदाकुमार अग्रवाल यांच्या कार्यालयात अनिल परसराम गणात्रा हा काम करतो. अग्रवाल यांनी अनिलला बँकेतून ९ लाख रुपये काढून आणण्यास सांगितले. दुपारी दोन वाजता तो दुचाकीने बँकेत गेला. पैसे काढून पिशवीत ठेवले. पिशवी दुचाकीच्या पेट्रोल टँकवर ठेवली आणि कार्यालयाकडे निघाला छाप्रूनगर चौकातून जात असताना पल्सर दुचाकीने आलेल्या दोघांनी अनिलकडील पैशाची पिशवी हिसकली आणि भरधाव पळून गेले. अनिलने आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत लुटारू पळून गेले होते. अनिलने मालक अग्रवाल यांना फोन करून माहिती दिली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत