चंद्रपूर शहरात सिलेंडरचा स्फोट? #chandrapur

प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करावी:- विशाल दा. निंबाळकर


चंद्रपूर:- येथील दादमहाल वार्डातील सुनीता गावंडे यांचे घरी मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाल्याने अख्खे घर हादरले.यात गावंडे परिवारचे लाखोंचे नुकसान झाले.आवाज इतका मोठा होताकी लोकांनी एकच गर्दी केली,आणि घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याची चर्चा शहरात पसरली. जखमी महिलेचे नाव सुनीता कवडू गावंडे असे आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचमाना केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


भाजपचे महानगर पदाधिकारी घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती भाजयुमो मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार यांनी जिल्हाध्यक्ष भाजयुमो विशाल दा. निंबाळकर यांना दिली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटना स्थळी पोहचले व घटनेची पाहणी करून भाजपा जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे व भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांना घटना स्थळी बोलवून पाहणी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून प्रशासनला माहिती व पंचनामा करायला सांगितले. पोलीस घटनास्थळी घेऊन पंचमाना केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी भाजयुमो मंडळ अध्यक्ष संजय पटले, मोहन मांचालवर, विपीन यंगलवार घटना स्थळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या