Top News

पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन #chandrapur



चंद्रपूर:- पंडित दीनदयाल उपाध्याय योजना व विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन स्कॉलरशिप मिळावी यासाठी चंद्रपूर येथे अनुसूचित जमाती च्या विद्यार्थ्यांचे लक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.


पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना ही ज्या मुलांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अश्यासाठी असते, पण विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ वेळेत मिळत नाही. त्यामुळे मुलांना खूप तळजोड करावी लागते. जसे मेसचा किव्हा रूमचा महिना भरला की रुमवाल्यांचे किंव्हा मेसवाल्यांचे वारंवार फोन येणे. यामुळे आदिवासी विद्यार्थी कुठतरी खचतोय. पंडित दीनदयाल योजनेचा लाभ मागील 11 नोव्हेंबर 2022 या तारखेला मिळाला होता. आता त्याला 3 महिने 10 दिवस होत चाललेले आहेत. तरी सुद्धा समोरच्या dbt चा काही पत्ता नाही.

  तसेच महाविद्यालयीन स्कॉलरशिप न आल्यामुळे भरपूर मुलांचे व मुलींचे कागदपत्रे महाविद्यालयातच अडकलेले आहेत आणि प्राध्यापकांचा असं म्हणणं आहे की, जो पर्यंत स्कॉलरशिप येणार नाही तो पर्यंत तुम्हाला कागदपत्रे मिळणार नाही.
         

        तसेच B.ed द्वितीय वर्षाला असणाऱ्या मुलांचे आता शेवटच्या सेमिस्टर चे किमान 2 ते 3 महिने बाकी आहेत. तरी सुद्धा त्यांच्या खात्यात निदान एक तरी स्कॉलरशिपची इंस्टॉलमेंट जमा झालेली नाही. 2021 मध्ये जे विद्यार्थी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची सुद्धा स्कॉलरशिप आणि कागदपत्रे महाविद्यालयातच अडकलेले आहेत, 
        
स्कॉलरशिपला जमा न व्हायला किती वर्ष होत चालले आहेत. आज सर्व गरजू विद्यार्थ्यांना न्याय मिळेल ह्या आशेने जिल्हा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग चंद्रपूर व जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर ह्यांची भेट घेऊन शिक्षण घेण्यास व शिक्षणात होणारी अडचण दूर करावी अशी मागणी घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. तसे निवेदन दिले आहे.

भविष्यात ही अडचण दूर नाही झाल्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करतील असा इशारा ही विद्यार्थी संघटनेने दिला आहे. आज आंदोलनात आकाश मडावी, बालवीर कोवे, संतोष कुळमेथे, सत्यपाल मेश्राम, लोकेश नैताम, लक्ष्मण कन्नाके, पवन मडावी, अनिकेत कन्नाके, आशा कोडापे, आस्था सोयाम, हर्षाली दडमल, निशा आत्राम, प्रिती आत्राम, गीता कुळमेथे तसेच अनेक विद्यार्थ्यांची गर्दी जमलेली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने