Top News

छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रोध्दारक कर्तृत्व व शौर्यातून प्रेरणा घेत युवकांनी राष्ट्र निर्मितीत योगदान द्यावे:- हंसराज अहीर #chandrapur



चंद्रपूर:- राजे छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे दैवत आहेत. ध्येय, दुरदृष्टी, असामान्य कर्तृत्व मात्या पित्यांनी बालपणापासून मनावर बिंबविलेल्या उदात्त संस्काराने स्वयंपूर्ण बनलेल्या या महान राजाने अवघ्या 16 व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेवून स्वराज्याची स्थापना करीत मोघल सत्तेचा नायनाट केला. महाराजांची जयंती साजरी करतांना त्यांच्या अचाट अफाट कर्तृत्व आणि शौर्यातून वर्तमान पिढीने प्रेरणा घ्यावी व राष्ट्रोन्नतीत योगदान देण्यास पुढे यावे असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शिवजयंतीच्या शुभपर्वावर केले.

भाजपा जनसंपर्क कार्यालयात दि 19 फेब्रुवारी, 2023 रोजी संपन्न झालेल्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात अहीर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्यास माल्यार्पण करुन त्यांच्या कृतिशिल, कर्तृत्वशाली इतिहासाचे स्मरण करीत अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी पुष्पार्पण करीत महाराजांच्या स्मृतिस नमन केले.

राजे छत्रपती शिवरायांनी बलाढ्य मोघलांना नामोहरण करीत सर्वांना समान न्याय देणान्या स्वराज्याची स्थापना केली. जाज्वल्य देशभक्ती काय असते हे तरुणांनी शिवकालिन इतिहास वाचून समजून घेण्याची आज देशाला गरज आहे. महाराजांनी स्वराज्याच्या भक्कम उभारणीसाठी, स्वराज्य रक्षणासाठी बलिदान देणारी मावळ्यांची फौज, शस्त्रसज्जता, आरमार दल, आर्थिक संपन्नता व तटबंदी सारख्या उपाययोजनेतून स्वराज्याचे रक्षण केले. यातून नव्या पिढीने बोध घेत राष्ट्राला शक्तीशाली बनविण्यासाठी योगदान देण्याच्या गरजेवर भर दिला.

याप्रसंगी अहीर यांनी सांगितले की महाराजांची अर्थनिती, युध्दनिती व राज्यकारभाराची नितीमुल्ये स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मादीजींच्या राजवटीची वाटचाल सुरु असून देश स्वयंपूर्णतेच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.
युवकांनी सुदृढ शरीर व शस्त्रनिपुनतेमध्ये परीपूर्ण होत देशाच्या रक्षणासाठी योगदान द्यावे प्रधानमंत्र्यांची अग्नीवीर ही संकल्पना याच धोरणाचा भाग असल्याचे अहीर यांनी यावेळी सांगीतले.

या शिवजयंती उत्सवास दिनकर सोमलकर, विनोद शेरकी, रवि लोणकर, प्रदिप किरमे, मधुकर राऊत, शैलेश इंगोले, गौतम यादव, सुभाष आदमने, शाम बोबडे, प्रलय सरकार, संजीव देवांग, जितू शर्मा यांचेसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने