Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

जबाबदार अधिकारी असले की प्रश्न असे लगेच सुटतात…. Chandrapur



चंद्रपूर:- एकाच शिक्षकांवर पाच वर्गांचा भार, शिक्षक एकाच वर्गात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब पालकांच्या लक्षात येताच पालकांची चक्क शाळा गाठून शाळेला कुलूप ठोकले.

एकाच शिक्षकांवर पाच वर्गांचा भार, शिक्षक एकाच वर्गात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब पालकांच्या लक्षात येताच पालकांची चक्क शाळा गाठून शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान, ही बाब बारावीच्या परीक्षेनिमित्त दौऱ्यावर असलेल्या कर्तव्यदक्ष तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ शाळा गाठून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेत तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती केली. कर्तव्यतप्तरता दाखवणारे अधिकारी असले की प्रश्न कसे लगेच सुटतात याचा प्रत्यय गोंडपिपरी तालुक्यातील हेटी नांदगाव येथे आला.

जिल्हा परिषद हेटी नांदगाव शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. मात्र, येथील सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देण्याचे ओझे एकच शिक्षक आपल्या खांद्यावर वाहत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत हाेते. यामुळे वैतागलेल्या पालक, विद्यार्थ्यांनी शिक्षकांची नियुक्ती करा, ही मागणी घेऊन पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान, बारावीच्या परीक्षेनिमित्त याच परिसरात दौऱ्यावर असलेले गोंडपिपरी तहसीलदार के.डी. मेश्राम, संवर्ग विकास अधिकारी शालिक मावलीकर यांनी शाळा गाठली. पालक विद्यार्थ्यांची संवाद साधला. शिक्षकांची गरज लक्षात घेत तात्काळ शिक्षकाची नियुक्ती केली. कर्तव्यतप्तरता दाखवणारे अधिकारी असले की प्रश्न कसे लगेच सुटतात याचा प्रत्यय हेटी नांदगावातील नागरिकांनी अनुभवला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत गावून अधिकाऱ्यांचे स्वागत व कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत