Top News

विसापूर परिसरात सापडला संशयास्पद सिलेंडर #chandrapur


चंद्रपुरातील स्टेट बँकवरील दोरोड्याशी संबंध असल्याचा संशय!विसापूर:- नांदगाव पोडे-बल्लारपूर रोडच्या बाजूला विसापूर शेतशिवारात लटारी थेरे यांच्या शेता जवळ सकाळी प्रभात फेरीला जाणाऱ्या नागरिकांना एक भले मोठे ऑक्सिजन सिलेंडर दिसले. नागरिकांनी त्या बाबतची माहिती विसापूर पोलीस चौकीत दिली लगेच पोलीस घटनास्थळावर पाहणी करून त्या बाबतची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना दिली त्यानी घटनेची गंभीरता बघता तात्काळ घटना स्थळावर दाखल झाले व त्याचा पंचनामा करून वरिष्ठांना अवगत केले.

विसापूर शेतशिवारात नांदगाव पोडे बल्लारपूर रोड लगत लटारी थेरे यांच्या शेता जवळ ऑक्सीजन सिलेंडर संशयास्पद स्थितीत आधळून आल्यावर चंद्रपूर शहर पोलिस व एल सी बी पथकाने परिसराची कसून चौकशी केली व याचा सबंध चंद्रपूर येथील चंद्रपूर - घुग्घूस मार्गावरील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत झालेल्या दरोड्याशी तर नाही ना? या दिशेने त्यांनी पडताळणी केली व परिसरातील नागरिकांना या बाबत विचारणा केली व त्या दिशेनी त्यांचा तपास सुरू होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने