Top News

पोंभुर्णा नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक अविरोध #chandrapur


विरोधकांचा निवडणूकीवर बहिष्कार

जुनेच पदाधिकारी कायम भाजपाचे वर्चस्व

पोंभूर्णा:- पोंभुर्णा नगरपंचायत विषय समितीच्या सभापती पदासाठी आज घेण्यात आलेल्या निवडणूकीत भाजपा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सभापतीपदाच्या निवडणूकीत विरोधी गटाने बहिष्कार टाकत सभागृहात येणे टाळल्याने सदर निवडणूक अविरोध होऊन स्थायी व विषय समितीचे पदाधिकारी सभापतीपदावर कायम ठेवण्यात आले.

मागील वर्षी पोंभूर्णा नगर पंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती.सदर निवडणूकीत भाजपाचे १०,शिवसेनेचे ४,वंचितचे २ व कॉंग्रेसचे १ असे एकुण १७ नगरसेवक निवडून आले होते.मागील वर्षी भाजपाला बहुमत मिळाल्याने एक हाती सत्तास्थापन केली. यावेळी झालेल्या विषय सभापती निवडणूकीत सुध्दा भाजपाने सत्ता कायम ठेवली.

निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ६५,६६ अन्वये स्थायी व विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक २२ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता नगरपंचायत सभागृहात घेण्यात आली.यावेळी नगर पंचयातचे सत्ताधारी भाजपाचे १० नगरसेवक उपस्थीत होते तर बाकी शिवसेना,वंचित व काँग्रेस विरोधी पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित होते.

यामध्ये स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदीसाठी शेता वनकर,शिक्षण समितीच्या सभापतीपदासाठी आकाशी गेडाम व महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदासाठी रोहनी ढोले यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे त्यांचे अविरोध निवड करण्यात आली.

मागील निवडणूकीत ठरल्याप्रमाणे नगरपंचायतचे उपाध्यक्ष अजित मंगळगिरिवार यांना बांधकाम व वित्त समितीच्या पदसिध्द सभापती म्हणून घोषित करण्यात आले. महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती उषा गोरंतवार यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष हे पदसिध्द सभापती असुन चारही विषय समितीचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य राहणार आहे.

निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार शुभागी कनवडे,व सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून नगरपंचयातचे मुख्याधिकारी आशिष घोडे यांनी काम पाहिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने