आरंभ बहुद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या तर्फे आयुक्तांना निवेदन
चंद्रपूर:- मिलींद नगर, पठानपुरा गेट या भागातील नागरिक मागील बऱ्याच वर्षापांसून मुलभूत सुविधांपासुन वंचित आहेत. येथील रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे तसेच पथदिवे नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना रात्रीच्या वेळेस येण्या जाण्यास अडचनींचा सामना करावा लागतो. तसेच पावसाळ्याच्या दिवासात सुध्दा येथे सतत पाणी साचल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील नागरिकांची अडचण लक्षात घेवून आपण लवकरात लवकर पठानपुरा गेट ते प्रतिक अंगरवार यांच्या घरापर्यंत रस्त्याचे बांधकाम करावे व पथदिवे लावण्यात यावे अशी मागणी आरंभ बहुद्देशीय संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष शैलेश दिंडेवार यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रतिक अंगरवार उपस्थित होते.