चंद्रपूर:- शिवजयंतीच्या निमित्ताने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वागतासाठी जगदंब ढोल-ताशा पथक सज्ज झाले होते. जगदंब ढोल-ताशा पथक चंद्रपूरातील उत्तम असे ढोल-ताशा पथक आहे. ढोल-ताशा वाजवित असतांना ना. मुनगंटीवार यांना डफली वाजविण्याचा मोह आवरला नाही. सांस्कृतिक, वन व मस्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज रविवार १९ फेब्रुवारी रोजी शिव जयंती साजरी करताना बाल गोपालांसोबत जगदंब ढोल-ताशा पथकात डफली वादन करुईत सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी शिवभक्तांनी आपल्या कॅमेऱ्यात ना. सुधीर मुनगंटीवार हे डफली वादन करीत असतांनाचा व्हिडिओ कैद केले.
चंद्रपूर येथील भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे रविवार 19 फेब्रुवारीला शिव जयंती उत्सवाचे आयोजन सकाळी 9 वाजताच्या सुमारास करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य,वन व मत्स्यपालन व्यवसायमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते ''जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा...''या राज्यगीताचे शुभारंभ पटेल हायस्कुल समोरील शिव स्मारक येथे केले.