लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती चिंतन दिवस म्हणून साजरी
स्काऊट गाईड नी राबविले स्वच्छता अभियान.
राजुरा:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट व जिजामाता गाईड युनिट च्या वतीने आंतरराष्ट्रीय स्काऊट दिन, लॉर्ड बेडन पावेल यांची जयंती चिंतन दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शालेय परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. चारित्र्य, आरोग्य, उद्यमशीलता आणि सेवाभाव ही चतुसूत्री असणारी जगभर पसरलेली बालवीर संघटना. या संघटनेचे जनक लॉर्ड रॉबर्ट स्टीफन्स स्मिथ बेडन पॉवेल यांची 22 फेब्रुवारी रोजी जयंती ही आंतरराष्ट्रीय स्काऊट दिन चिंतन दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते.
शालेय स्तरावरील या कार्यक्रमाला आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट लीडर बादल बेले, रुपेश चिडे, जिजामाता गाईड युनिट लीडर रोशनी कांबळे, कब -बुलबूल युनिट लीडर वैशाली टिपले, अर्चना मारोटकर, सुनीता कोरडे आदींची उपस्थिती होती. यावेळी विध्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात लॉर्ड बेडेन पॉवेल व लेडी बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून करण्यात आली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत