नेहरूंनी वाटप केलेली जमीन कुणी केली हडप? #Chandrapur #ballarpur


खोटे कागदपत्रे तयार करून अजूनही सुरू आहे व्यवहार

बल्लारपुरातील पीडितांचा संतप्त सवाल


चंद्रपूर:- भारत व चीनचे युद्ध झाल्यानंतर तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी युद्धात शाहिद झालेल्या व सर्वात समोर असलेल्या रेजिमेंटच्या सैनिकांच्या परिवाराला व त्या त्या समाजातील भूमिहीनांना प्रत्येकी 4 एकर जमिनीचे वाटप केले. परंतु काही वर्षांनंतर या जमिनीचे खोटे दस्ताऐवज तयार करून खरेदी विक्री करण्याचा प्रताप काही भूमाफियांनी केला. असा प्रकार बल्लारपुरात उघडकीस आला आहे.

वाटपात मिळालेली जमीन विक्री करता येत नाही. असा कायदा असतांनाही आजही या जमिनीचे व्यवहार केले जात आहे. हा प्रकार त्या मूळ भूमीधारकांच्या वारसांवर अन्याय करणारा असून यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बल्लारपूर येथील भूमाफिया द्वारा पीडित आनंद मातंगी, प्रेमसागर अरकीला, संतोष शेडमाके, नितीन सोयाम, रंगय्या अडुरवार व तिरुपती पुल्लूरवार यांनी पत्रपरिषदेतून केली आहे.
यावेळी आनंद मातंगी म्हणाले, महराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 मधिल कलम 42 मध्ये वाटपाची जमीन खरेदी विक्री करून अकृषक करता येत नाही. त्या नंतरही गोरक्षण वार्डातील या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. चर्म व्यवसाय करणाऱ्या भुमिहीन मादगी व इतर समाजाच्या लाभार्थीना जी जमिनी शासनानी वाटपात दिलेली आहे. त्या जमिनी खरेदी विक्री किंवा अकृषित करु नये असे महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 मधिल कलम 42 मध्ये नमूद आहे. अवैधरित्या खरेदी विक्री किंवा अकृषक कोणत्या नियमान्वये करण्यात येत आहे व हे सर्व कोणते अधिकारी व कर्मचारी करत आहेत याची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. दोषींवर कारवाई करून त्या जमिनी पुन्हा चर्म व्यवसाय करणाऱ्या भुमिहीन मादगी व इतर समाजाच्या लाभार्थीना द्याव्या, अशी मागणी त्यांनी केली.

यांना मिळाली होती जमीन

1960 च्या दशकात बल्लारपूर येथील महागु सोमा, दुडापाक रायमल्लु येल्लय्या, जोगु राजय राजय, कलवल लिंगा राजम, भिमराव लिंगा व इतर,दासर व्यकंटी,लांम्बे कलवल, कनकय्या राजम, रंगय्या नरसय्या अडूरवार,अडूर नर्सय्या, दुडापाका रायमल्लु, रामा वल्द दसरु गोंड, इसरा फकरा गोंड, राजय्या पोचय्या साटला, फुल्लुर बालय्या मुतय्या, समय्या बुच्चया दुर्गे, गंगय्या पोचम, जोगु येल्लय्या राजम, कवडू डोमा चुनारकर, पोचु राजु मावलीकर, रामा वल्द दसरु गोंड, समलु बुचम दुर्गे, अश्या एकूण 22 परिवाराला 4 एकर प्रत्येकी जमीन देण्यात आली होती, असे संतोष शेडमाके म्हणाले.

तहसीलदारांच्या नोटीसने उघडकीस आला प्रकार


बल्लारपूर येथील तहसीलदारांनी 24/09/2018 ला जमीन मालकांच्या नावे नोटीस बजावला. त्यात त्याना हजर राहून जमीन विक्रीचे कारण स्पष्ट करायचे होते. हा नोटीस हातात पडल्यावर वारसांना कळले की आपली जमीन पण आहे. ज्यांना जमीन मिळाली ते अशिक्षित होते. त्याच काळात सुरू झालेल्या कोळसा खाणीत सारे काम करु लागले आणि भूमिधारीचे दुर्लक्ष झाले. या सर्वांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हा भूमाफियांनी 70 च्या दशकात फेरफार करून जमीन गडप केली, असाही आरोप आनंद मातंगी यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या