Top News

तब्बल पंधरा वर्षांनी मिळाले कुणाडा वासियांना स्वतःच्या नावाचे सातबारे #chandrapur #bhadrawati


खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाला यश

भद्रावती:- वेकोली प्रशासनातर्फे पुनर्वसीत करण्यात आलेल्या कुणाडा गावातील गावकऱ्यांना खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने तब्बल पंधरा वर्षानंतर स्वतःच्या नावाचे सातबारा मिळाले आहे.

➡️
नगर परिषद सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते कुणाडावासियांना या सातबारांचे वितरण करण्यात आले.यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर,नगराध्यक्ष अनील धानोरकर, मुख्याधिकारी विशाखा शेळकी,इंटकचे नेते धनंजय गुंडावार आदी मान्यवर उपस्थित होते.

➡️
वेकोली प्रशासनातर्फे कोळसा खाणीसाठी संपादित करण्यात आलेल्या जुन्या कुणाडा गावाचे पुनर्वसन भद्रावती शहरानजीक 2008 मधे नविन कुणाडा या नावाने करण्यात आले.या पुनर्वसीत गावात जवळपास 352 गावकऱ्यांना वेकोलीतर्फे जागेचे पट्टे देण्यात आली.मात्र या सर्व जागांचे सातबारा अद्यापपर्यंत वेकोली प्रशासनाच्याच नावावर होते.त्यामुळे येथील गावकऱ्यांना त्यांच्या दैनंदीन कामात किंवा कर्ज उचलण्यास अडचणी निर्माण होत होत्या.घरांचे सातबारा गावकऱ्यांच्या नावाने करण्यात यावे यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून कुणाडा येथील गावकऱ्यांचा संघर्ष सुरु होता.या दरम्यान गावकऱ्यांनी याआधी अनेक निवेदने देऊन सातबारा आपल्या नावाने करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र पंधरा वर्षाचा मोठा कालावधी ऊलटुनही सदर सातबारा हे त्यांच्या नावाने झाले नव्हते.

➡️
बाळू धानोरकर हे खासदार झाल्यानंतर गावकऱ्यांनी आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली व न्याय मिळवून देण्याची विनंती केली.या समस्येची लागलीच दखल घेत त्यांनी पाठपुरावा करीत व प्रयत्न करीत खासदार बाळू धानोरकर यांनी गावकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या नावाचे सातबारा मिळवून दिले.घरांचे सातबारा गावकऱ्यांच्या नावाने झाल्यामुळे आता त्यांच्या चिंता दुर झाल्या असुन त्यांना आता या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने