वनकर्मचाऱ्यांवर दगडांचा मारा, हवेत गोळीबार करताच तस्कारांचा पोबारा #chandrapur #gadchiroli #Sironcha #smuggling #firing


गडचिरोली:- मध्यरात्री midnight सागाची तस्करी smuggling करणाऱ्यांनी गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांवर दगडांचा वर्षाव केला. प्रत्युत्तरात वनकर्मचाऱ्यांनी हवेत गोळीबार firing केल्यावर तस्करांनी बैलगाड्या जागीच सोडून पोबारा केला. सिरोंचा वनपरिक्षेत्रातील चिटूर ते दुब्बापल्ली जंगलात हा थरार झाला.

सिरोंचा Sironcha वनपरिक्षेत्रातील अधिकारी, वनकर्मचारी व आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी संयुक्त गस्त घालत होते. दुब्बापल्ली जंगलात forest कर्मचारी पाळत ठेवून असताना २४ मार्च रोजी मध्यरात्री एक वाजता सागतस्कर बैलबंडीमध्ये साग लठ्ठे भरुन येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता सागतस्करांनी वनकर्मचाऱ्यांवर दंगडांचा मारा करीत हल्ला केला. साग तस्करांना पांगविण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी पिस्तलमधून हवेत गोळीबार केला. यावेळी सागतस्कर बैल व बंड्या सोडून अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले.

सिरोंचा वनविभागाच्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षे अधिकारी पी.एम. पाझारे, आर.डी.तोकला, वनपाल एम.बी.शेख, एस.एस. नीलम, वनरक्षक आर. के. शेरकी, ए.एस. नैताम, आर. वाय. तलांडी, पी.टी. दर्रो, एम. जे. धुर्वे, वाहनचालक आर. बी. आत्राम, ए. जी. आत्राम तसेच आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील वनरक्षक आर. पी. गेडाम, ए.डब्ल्यू. तलांडी, सी. पी. दुर्गे तसेच रोजंदारी वनमजूरांनी पार पाडली.

घटनास्थळावरुन १४ बैल, ७ बैलगाड्या व सागाची ३१ लाकडे असा मुद्देमाल जप्त केला. मध्यरात्री एक वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत वनाधिकाऱ्यांनी रात्री जागून काढत ही कारवाई केली. जप्त केलेला माल डेपोमध्ये हलविण्यात आला असुन पुढील कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. पाझारे हे करीत आहेत.

#Chandrapur #nagpur #Nagpur #Maharashtra #Sironcha #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forest #firing #smuggling

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत