Top News

चंद्रपूर जिल्ह्यात बछड्यासह वाघिणीचा मृत्यू #chandrapur #gondpipari #Dhaba #tiger #forest



चंद्रपूर:- चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील धाबा (Dhaba) वनपरिक्षेत्रांतर्गत सुकवाशी (Sukwashi) डोंगरगाव (Dongargaon) जंगलात (forest) बछड्यासह एका वाघिणीचा कुजलेल्या अवस्थेत मृत्तदेह (dead body) आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली. वाघिणीच्या अन्य बछड्यांचा वनविभाग शोध घेत आहे. ही घटना सुकवाशी वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १६३ व १६१ मध्ये उघडकीस आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा वनपरिक्षेत्रांतर्गत सुकवाशी वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १६१ मध्ये शुक्रवारी (दि. २४) एका बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर वन विभागाने आज शनिवारी (दि. २५) शोध मोहिम हाती घेतली असता, कक्ष क्रमांक १६३ मध्ये वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून बछडा व वाघिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला आहे. दोन्ही वाघांना अग्नी दिला आहे. वाघीण आणि बछड्याचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या वाघिणीचे अन्य काही बछडे होते का? याचा शोध वनविभाग घेत आहे.

गोजोली सुकवाची वनपरिक्षेत्रात विद्युत प्रवाह सोडलेल्या तारांमुळे वन्य जीवांची शिकार केली जाते. या परिसरात अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने वाघांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाघीण आणि बछड्याचा मृत्यू नैसर्गिक आहे की शिकार करण्यात आली आहे? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

#Chandrapur #nagpur #gondpipari #Dhaba #tiger #forest #Adharnewsnetwork #bhairavdiwase #death #tigerdeath

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने