काँग्रेसच्या गडाला युतीने लावला सुरुंग..! #Chandrapur #Jivati

Bhairav Diwase
0

कोदेपूर सोसायटी युतीच्या ताब्यात; 13 पैकी 13 युतीचे उमेदवार विजयी


जिवती:- जिवती (Jivati) तालुक्यातील महत्वाची मानल्या जाणाऱ्या आदिवासी सेवा सहकारी संस्था मर्यादित कोदेपूर (kodepur) सोसायटी ची निवडणूक (Election) दि. 25 मार्च ला पार पडली त्यात गोंडवाना गणतंत्र पार्टी, भाजप, (BJP) शेतकरी संघटनेच्या युतीने कोदेपूर सोसायटी वर आपला झेंडा फडकवला.

मागील अनेक वर्षा पासून काँग्रेस च्या (Congress) ताब्यात असलेल्या या सोसायटी वर युतीने आपले 13 ही उमेदवार (candidate) विजयी (victorious) करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

गोंडवाना गणतंत्र पार्टी, भाजप, शेतकरी संघटना युतीचे निवडून आलेल्या संचालकांमध्ये निशिकांत रेशमाजी सोनकांबळे, महेश बळीराम देवकते, मारोती झाडू कोडापे, रामू मारोती कोडापे, लक्ष्मण मानकु गेडाम, सोनेराव कान्हू पेंदोर, चेनराव सोमू मडावी, आनंदराव जंगू शेडमाके, राम गोविंद चव्हाण, दत्तात्रय केरबा कांबळे हे विजयी झाले. निवडणुकीत युतीच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या त्यात रमेश दत्ता पुरी, जैतूबाई बापूराव कोडापे यांची बिनविरोध निवड झाली.

ही निवडणूक माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार संजय धोटे आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली.

निवडून आलेल्या संचालकांचे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, माजी सभापती भीमरावजी मेश्राम, नगरसेवक ममताजी जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे, भाजप तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश पुरी यांच्यासह जिवती तालुक्यातील युतीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

#Chandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #election #result #Jivati #BJP #Congress #political 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)