चंद्रपूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संपूर्ण 206 नियमित सफाई कामगार व 44 एवजदार कामगार यांना नव्या सफाई कंत्राटामध्ये समावेश करून घ्या. कुणालाही बेरोजगार करू नका व शहरातील नालेसफाई पूर्वीप्रमाणे सुरळीत करा या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांना देण्यात आले. तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कामगारांच्या न्याय हक्क करिता व शहराच्या साफसफाई करिता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे देण्यात आला.
यावेळी मनसेचे माजी नगरसेवक सचिन भोयर, मनसे महिला जिल्हाध्यक्ष प्रतिमा ठाकूर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, कामगार सेना जिल्हाध्यक्ष नितीन भोयर, महिला जिल्हा उपाध्यक्ष मायाताई मेश्राम, महिला शहर उपाध्यक्ष वाणी साधलावार, श्रेयांश ठाकूर, समीर शेख, मंदा कांबळे, नीता भोंगळे, मंगेश चौधरी, अंकित मिसाळ आदी मोठ्या संख्येत कामगार उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत