Top News

जीवावर उठणाऱ्या लोहखनिज वाहतूकीच्या गाड्या शहरातून बंद करा #chandrapur #pombhurna #surjagad

पोंभूर्णा शहरवासीयांची मागणी

शेकडोच्या संख्येने चालू आहे जड वाहतूक


पोंभूर्णा:- गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील (District) सुरजागड लोह प्रकल्पातील (Surjagad Iron Project) लोहखनिजांची पोंभूर्णा (pombhurna) शहरातून ओव्हरलोड वाहतुक (Overload transport) होत असल्याने यामुळे प्रदुषण (pollution) व भविष्यात होणारे अपघात (accident), व दुर्देवी घटना नाकारता येणार नसल्याने पोंभूर्णा शहरवासीय व विविध सामाजिक संघटनांनी शहरातील वाहतूक बंद (Traffic stop in the city) करण्यात यावी यासाठी प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली असून सदर वाहतूक बंद न झाल्यास रास्ता रोको (block the way) करून तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. 


गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली (Etapalli) तालुक्यातील सुरजागड पहाडावरील सुरजागड लोह प्रकल्पासाठी लोहखनिज (iron ore) उत्खनन व वाहतुकीचे कंत्राट लॉयडस् मेटल अँड एनर्जी लिमिटेड या खासगी कंपनीला मिळालेले आहे.

सदर कंपनीने (Company) लोहखनिजाची जड वाहतुक चंद्रपूर (chandrapur) जिल्हातील पोंभूर्णा शहरातील रहदारीच्या मार्गाने रात्रंदिवस सुरू केली आहे. पोंभूर्णा शहर तालुक्याचे ठिकाण असून मोठ्या प्रमाणात नागरीकांची वर्दळ असते. अरुंद रस्ता व भरगच्च लोकवस्ती आहे. शहरातून लोहखनिजांची वाहतुक करणारे जड व भरधाव शेकडो वाहने राजरोसपणे सुरु असल्याने नागरीकांचे जीव धोक्यात आले आहे. कंपनीने आडमुठ व मुजोरी घोरण वापरून बेधडक शहरातून शेकडोच्या संख्येने लोहखनिज वाहतुक करणारे हाववा ट्रकने वाहतुक सुरु केली आहे.

सध्या प्राथमिक स्तरावर कंपनीने ९० गाड्यांनी लोहखनिज वाहतूक करीत आहे. पुढे या गाड्यांची संख्या ४०० गाड्यांच्या अधिक असणार असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. यामुळे पोंभूर्णा शहरातील नागरीक असुरक्षीत आहेत. भविष्यात अनुच्चीत व अपघाताची घटना घडू नये यासाठी शहरातून सुरू असलेली जड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी शहरवासीयांनी प्रशासनाकडे केली आहे.

लोहखनिज वाहतुक करणारे गाड्या गावातून सुसाट चालत आहेत शिवाय गाड्या सुव्यवस्थीत नसल्याने गाडीतील लोहखनिज कच्चा माल रस्त्यावर इतरेत्तर सांडत असल्याने प्रदुषण होत आहे. यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डोळ्यांच्या व श्वसनाच्या समस्या लोकांचे जीवावर उठणार आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (chandrapur District Guardian Minister Sudhir Mungantiwar) यांनी पोंभूर्णा शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देत माॅडेल शहर (Model city) बनविला आहे. मात्र शहरातील रहदारीच्या मार्गाने शेकडो गाड्याने लोहखनिज वाहतूक होत असल्याने शहर आता भक्कास होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहराला विद्रुपीकरणापासून वाचवण्यासाठी जड वाहतूक तात्काळ बंद करावी यासाठी शहरवासीयांनी पालकमंत्री यांचेकडेही मागणी केली आहे.

#Adharnewsnetwork #bhairavdiwase 
#chandrapurDistrictGuardianMinisterSudhirMungantiwar #Modelcity #Company #chandrapur #gadchiroli, #Gondwanauniversity #SardarPatelmahavidyalayachandrapur, #congratulations #ironore #blocktheway #Trafficstopinthecity #Surjagad #Etapalli #SurjagadIronProject #Overload #transport #pollution #accident 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने