चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीच्या चैत्र यात्रेला सुरुवात #chandrapur chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीच्या चैत्र शुद्ध षष्ठी आजपासून (दि.२७) सुरू होत आहे. चैत्र शुद्ध षष्ठी ते पौर्णिमा असा हे नवरात्र असतो. या नवरात्र दरम्यान लाखो भाविक जे आहेत. ते आंध्रप्रदेश, तेलंगाना, मराठवाडा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातून (From Andhra Pradesh, Telangana, Marathwada, Chhattisgarh and Maharashtra) येत असतात

मुख्य म्हणजे हा जो भाग आहे चंद्रपूरचा (chandrapur), या ठिकाणी शेकडो वर्ष गोंड राज्याच राज्य होत. गोंड राज्याची जी आराध्य दैवत आहे. ती माता महाकाली (mata Mahakali) होती. सहाजिकच जी राज्याची आराध्य दैवत होती. तीच इथल्या प्रजेची झाली. त्यामुळे इथले जे लोक आहे. म्हणजे आंध्रप्रदेश, तेलंगाना, मराठवाडा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र हे कुठे ना कुठे एका प्रकराचे धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या या माता महाकाली सोबत जोडल्या गेले. आणि त्यामुळेच या नवरात्रला अतिशय महत्त्व असतो.

मराठवाड्यातील जे लोक (people) आहेत ते या चंद्रपूर च्या देवीला चांदागडची देवी म्हणून संबोधतात. आणि त्यांची सर्वात मोठी गर्दी यावेळी असते. यावेळी या ठिकाणी मोठा उत्साह दिसतोय.

ऐतिहासिक महाकाली मंदिर परिसरात दरवर्षी चैत्र पौर्णिमेला आराध्य दैवत माता महाकाली देवीची यात्रा भरते. विदर्भ, मराठवाडा, तेलंगणासह इतर भागातील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. सोमवारी देवीची मुख्य पूजा तसेच घटस्थापना असल्याने भाविक मिळेल त्या वाहनाने चंद्रपुरात दाखल होत आहे.

भक्तांच्या निवासाकरिता मंदिराच्या आतील परिसरात शेड तयार करण्यात आले आहेत. शिवाय, मंडप टाकण्यात आला. ही यात्रा पुढील महिनाभर चालणार आहे. यात्रेमध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन तसेच महाकाली देवस्थान काळजी घेत आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल केला असून, मंदिर परिसरात पोलिस चौकी उभारण्यात आली आहे.

येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, महापालिका तसेच महाकाली मंदिर व्यवस्थापनाने संपूर्ण तयारी केली आहे.

#Adharnewsnetwork #bhairavdiwase #chandrapur #Gondwanauniversity #sardarPatelmahavidyalayachandrapur #mataMahakaliMandir #AndhraPradesh, Telangana #Marathwada #Chhattisgarh #Maharashtra #What'sup #instagram #Facebook