प्रियकराचा लग्नास नकार; तरुणीने फिनाईल पीत खाल्ल्या 'पॅरासिटेमॉल'च्या गोळ्या #chandrapur #wardha


वर्धा:- प्रेम (love) प्रकरणानंतर लग्नास नकार दिल्याने (By refusing to marry) निराश झालेल्या तरुणीने (young woman) फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वर्धा (wardha) जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) येथे ही घटना घडली आहे. पीडितेच्या मृत्यूपूर्व बयाणावरुन आरोपीविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. आरोपीचा (Accused) शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी (police) दिली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडितेशी आरोपी अमन प्रकाश कोठारे (रा. तेलंगखेडी) याने जवळीक निर्माण करुन तिचा विश्वास संपादीत केला. तसेच तिला लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र पिडितीने लग्नासाठी विचारले असता तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. ज्यामुळे तरुणीला मोठा धक्का बसला. या प्रकारानंतर पिडीतेने रागाच्या भरात फिनाईल पिऊन पॅरासिटेमॉलच्या २० गोळ्या व इतर गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, घटनेनंतर पीडितेला तत्काळ हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असून पोलिसांना दिलेल्या मृत्यूपूर्व बयाणात तिने झालेला प्रकार सांगितला. यावरुन हिंगणघाट पोलिसांनी आरोपी अमन कोठारे याच्याविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. Crime News

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #Adharnewsnetwork #bhairavdiwase #Wardha #crimepatrol #crimenews #crime #police # #Gondwanauniversitygadchiroli #sardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #spchandrapur
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत