पोंभुर्णा:- दिनांक 8 मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा येथे संदीप पेंदोर सर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सिंधुबाई पिंपळकर स्वयंपाकी तसेच सुनीताताई कोसरे मदतनीस या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महाराणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. सिंधूबाई पिंपळकर व सुनिताताई कोसरे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त मुलांनी भाषणे दिली. कु. धनश्री तोडासे हीने सुंदर स्त्रीभृण हत्येवरील गीत सादर केले. या कार्यक्रमात मुलांनी सर्वांगीण सहभाग नोंदविला. या कार्यक्रमानिमित्त मुलांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिंगाडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन वेदांत मडावी व नयन पेंदोर तर आभार प्रदर्शन हर्षल वेलादी यांनी केले. शेवटी सर्वांना चॉकलेटचे वाटप करून गोड शेवट करण्यात आला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत