Click Here...👇👇👇

"वृंदावन" काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा #chandrapur #saoli #gondpipari

Bhairav Diwase
1 minute read
सावली वासियांसाठी गौरवास्पद


सावली:- येथील रहिवासी असलेल्या जि.प. शिक्षिका वृंदा पगडपल्लीवार यांच्या 'वृदांवन 'या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा दि २६ मार्च रोजी रविवारला गोंडपिपरी येथील खैरे कुणबी भवन येथे होणार आहे. रसिक वाचकांना या निमित्ताने काव्य अभंगाची मेजवानी मिळणार आहे.
पंचायत समिती मुल अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जूनासुर्ला येथे त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. कवयित्री वृंदा पगडपल्लीवार यांच्या स्वलिखित 'वृंदावन 'काव्यसंग्रहातुन संत,महात्म्यांचे अभंग त्यांच्या अभंगातुन मिळणारी जिवन जगण्याची कला,यांचे अतिशय सुंदर काव्यात्मक वर्णन त्यांनी केलेले आहे.महाराष्ट्र हि संताची भुमी ,या महाराष्ट्रातील अनेक थोर संतांनी आपल्या अभंगातून मानवी मुल्याची शिकवण दिली आहे. अभंगातून समाजाच्या तळागाळापर्यंत मानवी संस्काराची जाणीव निर्माण करण्याचं व जोपासण्याचं महत्वपुर्ण कार्य वृंदावन अभंग संग्रहाच्या माध्यमातून होणार आहे. सदर काव्यसंग्रहातुन कवयित्री यांनी कोणत्याही अभंगावर अवडंबर न करता प्रत्येक संताच्या अभंगावर प्रकाश टाकलेला आहे.अत्यंत साधी व सोप्या भाषेत रसिक वाचकांना संतचरित्र सहज अभ्यासता येणार आहे. हे विशेष.


कवयित्री वृंदा पगडपल्लीवार या सावली शहरातील रहीवासी आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचे पती स्व.संतोष पगडपल्लीवार हे शिक्षक होते. त्यांच्या पतीच्या निधनानंतर मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आली. परंतु वाईट परिस्थितीला न डगमगता मुलाच्या शिक्षणाबरोबरच परिस्थितीशी संघर्ष करत, स्वतःला सावरत त्यांनी स्वतःचा हा छंद जोपासला.कविता, लेख लिहणे हा त्यांचा मुळातच छंद असल्याने त्या कवितेत रमत असत. आणि त्यातूनच 'वृदांवन 'काव्यसंग्रहाची निर्मिती झाली.या पुर्वी सुध्दा त्यांचे लेख,कविता वृत्तपत्रातुन प्रकाशित झालेले आहेत.या काव्यसंग्रहातुन मानवी मुल्यांची जडणघडण वाचक रसिकांना अभ्यासायला मिळणार आहे, त्यांच्या या काव्यसंग्रहाचा रसिक वाचकांनी लाभ घेण्याचे करावे...।