Top News

चंद्रपूरात राहुल गांधींविरोधात भाजपा आक्रमक #chandrapurचंद्रपूर:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील तमाम ओबीसी समाजाचा अपमान करणारे कॉंग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आज चंद्रपूरातील जटपुरा गेट परिसरात जिल्हा व महानगर भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करीत राहुल गांधींचा तिव्र शब्दांत निषेध नोंदविला. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले होते.


काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका जाहीर सभेत 'मोदी' आडनावावरून अपमानास्पद टिप्पणी करत ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला.

या प्रकरणाबद्दल सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आणि त्यापाठोपाठ काल संसंदेनेही त्यांचे सदस्यत्व रद्द केले. हे सर्व संवैधानिक प्रक्रियेने सुरू असतांना देखील देशाच्या लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात कॉंग्रेसची वर्तवणुक सुरू आहे. याचा आम्ही निषेध करतो. वाट भरकटलेल्या कॉंग्रेसींचा हा सर्व केविलवाणा प्रयत्न आहे. असेही याठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी म्हणाले.


याप्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपमहापौर राहुल पावडे, महानगर महामंत्री रवि गुरनूले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महानगर मंडळ अध्यक्ष रवी लोनकर, दिनकर सोमलकर, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्लीवार, माजी नगरसेविका सौ. शिलाताई चव्हाण, सौ. शितलताई गुरनुले, सौ. मायाताई ऊईके, सौ. वंदनाताई संतोषवार, सौ. प्रभाताई गुडढे, सौ. वर्षाताई सोमनकर, महानगर सचिव सय्यद चांद, विनोद शेरकी, गणेश रामगुंडेवार, धनराज कोवे, चंद्रपूर तालुका मंत्री विजय आगरे, भारत रोहणे, बाळू भोंगळे, विनोद खेवले, पारस पिंपळकर, प्रलय सरकार, कमलाकर येरमे, प्रदिप किरमे, रामकुमार आकापेल्लीवार, सतिश तायडे, सौ. सारिका संदूरकर, सुभाष पिंपळशेडे, धम्मप्रकाश भस्मे, प्रमोद शास्त्रकार, प्रकाश आलगमवार, तेजस अलगमवार, दिवाकर पुद्दटवार, अरूण रहांगडाले, ओम पवार, रमेश बुच्चे, मोहित डंगोरे, पराग मलोडे, राकेश बोम्मावार, सौरव मेनकुदळे आदींसह मोठ्या संख्येने जिल्हा व महानगरातून भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने