दूषित पाण्याच्या समस्या त्वरित सोडवा:- अंकित जोगी #chandrapurचंद्रपूर:- पाणी हा मानवी जीवनातील मुख्य घटक आहे. पाण्या शिवाय जीवन जगणं हे अशक्य आहे. गरीब श्रीमंत सर्वांना पाण्यावर समान हक्क आहेत. अश्यातच गेल्या काही दिवसापासून इंदिरानगर येथील नाग मंदिर चौक वाघमारे किराणा स्टोर्स च्या मागील बाजूस पाण्याची पाईप लाईन आहे. त्या पाईप लाईन च्या जोडणीतील नळ असलेल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून समस्याना तोंड द्यावे लागत आहे.

ती पाईप लाईन वाहत्या नाल्यालगत जुडून आहे. त्यामुळे नाल्यातून होणाऱ्या सांडपाणी मुळे त्या पाईप लाईन वरील अवलंबून असलेल्या नळ धारकांना आळात पाळात दूषित पाण्याला तोंड द्यावे लागते. त्यामुळे तेथील नागरिकांना नळ असून देखील पश्चात इकडे तिकडे पैसे देऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु नळा मधून येणाऱ्या पाण्याचे कर सर्व नळ धारक नियमित भरणा करतात देखील ह्या दूषित पाण्याचे त्रास त्यांना सहन करावे लागत आहे. यासाठी अंकित जोगी (महामंत्री भाजप युवा मोर्चा पूर्व विभाग चंद्रपूर) यांनी चंद्रपूर शहर महागरपालिका ला सोशल मीडिया च्या माध्यमातून तक्रार दिली आणि समस्या लवकरच मार्गी लावण्याची विनंती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत