Top News

जि. प. शाळेच्या विद्यार्थांची शिक्षणासाठी आर्त हाक #chandrapur


शिक्षक द्या आम्हाला, विद्यार्थ्यांची मागणी


सिंदेवाही:- शिक्षणाचे महत्व सांगणारा शिक्षकच तीन दिवसापासून संपावर असल्याने जि.प.शाळा,लाडबोरी येथील विद्यार्थांना शिक्षणाची भूक लागली आहे.त्याच भुकेने तीन दिवसापासून उपाशी असणाऱ्या विद्यार्थांनी व गावातील नागरिकांनी थेट “रास्ता रोको आंदोलन” केलं आहे.तेव्हा आंदोलन स्थळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण तात्काळ हजर होऊन विद्यार्थांना शाळेत जाण्यासाठी विनवणी केली.विद्यार्थानी त्यांच्या विनवणीला मान देऊन शाळेच्या पटांगणावर जाऊन बसले.लगेच ठाणेदार यांनी पंचायत समिती सिंदेवाहीचे गट विकास अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावणी केली.तेव्हा गटविकास अधिकारी हे घटनास्थळी आले असता त्यांनी ते दृश्य बघितलं व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,पालकवर्ग,सरपंच,उपसरपंच तसेच नागरिक यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कुठलंही समाधानकारक उत्तर दिल नाही.असं त्यांचे म्हणणे आहे. गावातील बचत गटाच्या महिला शिकवतील.असं त्या ठिकाणी गटविकास अधिकारी सुचवत होते.त्यानंतर त्यांनी गावातील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी,ग्रा.पं. चे पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठितांना पंचायत समिती सिंदेवाहीला बोलावलं आहे.विशेष म्हणजे पूर्वी निवेदन देऊन सुद्धा परत पत्र व्यवहार करण्यास सांगितलं.शिवराय,फुले,शाहू या महामानवा सारखा विचारधारेचा शिक्षक या परिस्थितीत मिळणार काय ? त्याचप्रमाणे सावित्री,फातिमा सारख्या शिक्षिका मिळतील का ? असाही प्रश्न गावकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.तसेच विद्यार्थी तीन दिवसापासून नियमित शाळेत येत आहेत.शालेय पोषण आहार बंद आहे.आणी जोपर्यन्त आम्हांला शिक्षक मिळत नाही तो पर्यंत आम्ही दररोज आंदोलन करू अशी भूमिका चिमुकल्या विद्यार्थांनी दर्शवली आहे.विशेष म्हणजे अद्यापही कोणताही तोडगा निघालेला नाही.

“ पंचायत समितीतील शिक्षणाधिकारी, पिसे यांच्याशी दै.सुवर्ण महाराष्ट्राच्या प्रतिनिधिनी फोनवरून संपर्क साधला असता “शिक्षक संपावर आहेत.” एवढंच बोलून फोन कट करण्यात आला.”

“ खाजगी शाळा सुरु आहेत. त्यात भांडवलदारांचे मुल शिकतात. जि.प.शाळेत आम्हा गरिबांचे मूल शिक्षण घेतात.त्यामुळे त्यांचं कुठलही नुकसान होत नाही. नुकसान होतंय आम्हा गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचं.” पालकवर्ग.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने