Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

म्हशी मागे धावताच वाघाने ठोकली धूम! #Chandrapurचंद्रपूर:- वाघाने एक म्हशीवर हल्ला केला व तिला जबड्यात पकडून शिकार करणार तोच सोबतच्या 5 ते 6 म्हशी वाघाच्या मागे धावल्या. एकाच वेळी इतक्या म्हशी मागे धावल्याचे बघून घाबरलेल्या वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली आणि म्हशीचे प्राण वाचले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघाच्या घटनेची चित्रफीत सध्या समाजमाध्यावर प्रसारित होत आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघाच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. या परिसरात अनेकांना वाघाने दर्शन दिले आहे. तसेच वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत या परिसरात 4 जणांचा बळी घेतला आहे. या परिसरात वाघ, बिबट्या व अस्वलाची दहशत आहे. मंगळवारी धुलिवंदनाच्या दिवशी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास वीज केंद्र परिसरातील प्रवेशद्वारजवळ काही म्हशी चार्‍याच्या शोधत फिरत होत्या. या म्हशींना बघून त्यांच्या मागावर असलेल्या वाघाने एका म्हशीला एकांतात गाठत हल्ला केला व जबड्यात पकडून शिकार करणार तोच सोबत असलेल्या इतर म्हशींना वाघाने सहकारी म्हशीवर हल्ला केल्याचे दिसले.

त्या म्हशीचे प्राण वाचविण्यासाठी अन्य 5 ते 6 म्हशी एकाच वेळी पट्टेदार वाघाच्या मागे धावल्या. 5-6 म्हशी आपल्याच दिशेने धावत सुटल्याचे बघून वाघाने शिकार सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेचे संपूर्ण द़ृश्य वीज केंद्र परिसरात लावण्यात आलेल्या कॅमेरामध्ये चित्रित झाले आहे. शिकारीत तरबेज असलेला वाघाला म्हशींनी पळवून लावले. सध्या म्हशी व वाघाची ही चित्रफीत समाजमाध्यमावर 'व्हायरल' होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत