Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

इंस्टाग्रामवर 'गुड बाय' म्हणत तरुणीची आत्महत्या! #Chandrapur #suicideचंद्रपूर:- जागतिक महिलादिनी इंस्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर करून 'गुड बाय' म्हणत एका तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. गायत्री गजेंद्र रामटेके (२० वर्षे) असे मृत तरूणीचे नाव असून ती लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला येथील रहिवासी आहे. चंद्रपूर येथील घुटकाला वार्डातील भाड्याच्या घरात तिने ही आत्महत्या केली.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळले नसले तरी तिने इन्स्टाग्राम वर स्वतःचा फोटो शेअर करत, 'हा माझा शेवटचा फोटो, Good By' असा संदेश टाकला. गायत्रीचे आईवडील यापूर्वीच मृत्यू पावले असून बहीण भाऊ असे दोघेच कुटुंबात असतात.

ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी चंद्रपूर येथे राहत होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चंद्रपूर शहर पोलीस पुढील तपास करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत