संतोष शिंदेंची हत्या हि प्रेम संबंधातून?


कुटुंबीयांचा पत्रपरिषदेत आरोप


चंद्रपूर:- जिवती तालुक्यातील टेकामांडवा येथील संतोष राजेंद्र शिंदे या युवकाचा गावापासून काही किमी अंतरावर जंगल परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.

एकंदरीत मृतदेहाच्या स्थितीवरून त्याने कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या केली नाही. तर प्रेमसंबंधातून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप संतोषची आई, वडील आणि भावाने चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला. यातील एका आरोपीची पोलीस ठाण्यात उठबस असल्याने तो पोलिसांचा खबरी असल्याने टेकामांडवा पोलिसांकडून प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप शिंदे याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मृतक संतोषचे गावातील एका पतीपासून विभक्त माहेरी राहत विवाहित युवतीशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. संतोषचे प्रेमसंबंध युवतीच्या घरच्यांना व नातेवाईकांना खटकत होते. याच प्रेमसंबंधातून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृतकाचे वडील राजेंद्र शिंदे, आई भारतबाई शिंदे, भाऊ प्रल्हाद शिंदे यांनी केला आहे. २८ मार्च रोजी मृतक संतोष हा आईला बाहेर जाऊन येत असल्याचे सांगून घराबाहेर पडला. परंतु, तो परतलाच नाही. बेपत्ता होण्याच्या दिवशी संतोष हा कैलास सोलनकर व विनोद हाके आणि विवाहित महिलेच्या पतीसोबत फिरत असल्याचे अनेकांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी जात असताना विनोद हाके या युवकाने रस्त्यात अडवून तुम्ही घरा जा असे सांगून घरी पाठविले. तुमचा मुलगा उद्या सकाळी घरी येईल, असेही विनोद हाके याने सांगितल्याची माहिती मृतकाच्या कुटुंबीयांनी दिली. पंचनाम्यातही अनेक त्रुटी आहेत. त्याच्या छातीवर आणि डोक्यावर मार आहे. मात्र, शवविच्छेदनात त्याचा उल्लेख नाही. नसल्याचाही आरोप संतोषच्या कुटुंबीयांनी केला आहे. पत्रकार परिषदेला किशोर पोतनवार, रुपेश निमसरकार, संतोष डांगे, अशोक मस्के उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत