गडचिरोलीत झालेल्या चकमकीत दोन लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा; शस्त्रेही जप्त #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0

गडचिरोली:- महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून, त्यात एका नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने या नक्षलवाद्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

वास्तविक, अलीकडच्या काळात जिल्ह्यातील तोडगट्टा भागात नक्षलवाद्यांनी स्थानिक जनतेला नक्षली चळवळीत सामील होण्यासाठी धमकी दिली होती, त्यानंतर नक्षलविरोधी अभियान सुरू करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रेही जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय नक्षलवादी समीर उर्फ साधू लिंग मोहंडा हा चकमकीत ठार झाला असून त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. समीरला 2014-15 मध्ये चितगाव दलममध्ये सदस्य म्हणून दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 2017 पासून तो भास्करच्या प्लाटून क्रमांक 2 मध्ये सुरक्षा रक्षक होता आणि 2018 पासून तो कंपनी फोरमध्ये काम करत होता. तो सध्या कंपनी क्रमांक १ मध्ये काम करत होता, असे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तोडगट्टा भागात नक्षलवाद्यांनी स्थानिक लोकांना नक्षली चळवळीत सामील होण्यासाठी धमकी दिली होती. यासोबतच स्थानिक ग्रामस्थांना भडकावण्यासाठी दमकोडवाही खाणकामाचा खोटा बहाणा करून रस्तेबांधणी व इतर विकासकामांच्या विरोधात पत्रकांचे वाटप करण्यात आले होते.

पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे. ज्यामध्ये एक देशी रायफल, एक भरमार आणि 303 रायफलचा समावेश आहे. यासोबतच नक्षलवाद्यांचा बराचसा मालही जप्त करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)