आकर्षक देखाव्यांनी वेधले भद्रावतीकरांचे लक्ष; हजारो नागरिकांची उपस्थिती
भद्रावती:- भद्रावती येथे श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम दि . २८ ते ३० मार्च २०२३ पर्यंत विविध कार्यक्रमांनी व भव्य शोभायात्रेनी संपन्न झाला . श्रीराम जन्मोत्सवाची सुरुवात रामायणातील आदर्श भरत, हनुमान, लक्ष्मण, सादरकर्ते प्रा. विवेकसर सरपटवार या कार्यक्रमाने झाली, तीन दिवस चाललेल्या श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमांमध्ये प्रभू श्रीराम रूपसज्जा कार्यक्रम तसेच राजस्थानी महिला मंडळ यांनी रामायणातील संगीत सुंदरकांड कार्यक्रम सादर केला.
ह.भ.प. माधवबुवा धुमकेकर यांचे सुश्राव्य वाणीतून श्रीराम जन्माचे किर्तन तसेच श्रीराम जन्म कार्यक्रम संपन्न झाला,सायंकाळी ७.०० वाजता विठ्ठल मंदिर येथुन शोभायात्रेला प्रारंभ झाला , शोभायात्रेचे पूजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळवंत दादा गुंडावार तसेच शोभायात्रेचे उद्घाटन नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले,या प्रसंगी मनोहरराव पारधे, रवींद्र शिंदे,प्रफुल चटकी, नंदु पढाल, निलिमाताई शिंदे इत्यादी मान्यवरांनी श्रीरामाच्या मुर्तीचे पुजन केले.
शोभायातत्रे मधील सुशोभित रथावरील प्रभु रामचंद्र व सितामातेची आकर्षक मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती,त्याचप्रमाणे रामायणातील विविध प्रसंगावर आधारित आकर्षक देखावे त्यामधे सीतेची अग्निपरीक्षा, सेतू बांधा रे सागरी, कुंभकरण निद्रा, द्रौपदी स्वयंवर,भिमा कडुन जरासंधाचा वध ,प्रेमभक्ती पोटी प्रभु रामचंद्र शबरीचे उष्टे बोरे खातांना, भगवान शिव मार्कंडेला जीवनदान देताना, बाणशयेवर भीष्म पितामह, कैलास पर्वतावर भगवान शंकर विराजमान, कालिया मर्दन,इत्यादी विविध नयनरम्य आकर्षक झाकी मंडळाचे वतीने शोभायात्रेत सहभागी करण्यात आले.

होते,शोभायात्रेत एकुण ५४ भजनी दिंडया,दुर्गावाहीणीच्या वतीने ध्वज संचलन, कलश धारी महिला पथक, बँड पथक, डी.जे.सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी स्वागतदार , विद्युत रोषणाई , ध्वनी क्षेपक ,भगवे ध्वज , श्रीरामाचे बॅनर लावण्यात आले होते त्याचप्रमाणे जुना बस स्थानक चौकामध्ये आकर्षक राम मंदिर प्रतिकृती केटरिंग असोसिएशनचे वतीने उभारण्यात आली होती,अनेक वैयक्तिक व सामाजिक संस्था कडुन जलपान , सरबत , मिठाई , अल्पोपहार वितरण करण्यात आले.मिरवणुक मार्गावर हजारोंच्या संख्येने जनसमुदाय शोभायात्रा पाहण्यासाठी जमला होता.त्यामुळे भद्रावती नगरीचे वातावरण राममय होवून ,जनुकाही अयोध्याच अवतरली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता चंद्रकांतजी गुंडावार, उल्हासजी भास्करवार, गोपाल ठेंगणे ,अमोल गावंडे , झनक चौधरी,सचिन सरपटवार, रूपचंद धारणे, गुणवंत कुत्तरमारे, विशाल गावंडे, राजेश्वर मामीडवार, अनंता ताठे, अशोक उपलंचीवार, बालाजी उपलांचीवार, भोगेकर सर, अभिजीत नारळे , अविनाश पाम्पट्टीवार मधुकर सावनकर , शरद राजुरकर , सुरेश परसावार , मुरलीधर मेश्राम , भास्कर फाये , मारोती झाडे , प्रकाश पिंपळकर,संजय रॉय, गणपत ठाकरे ,मंगेश वझे, मनोज बोरसरे, क्षितिज शिवरकर, महेंद्र वनकर, शालिक दानव , बंडू उरकुडे,रमेश धाबेकर,एस.के.पुराम, मारोती डंभारे,मारोती कोरेवार यांचे तसेच समितीचे सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.