Top News

लोकांच्या जिवावर उठलेला बिबट अखेर जेरबंद #chandrapur



भद्रावती:- भद्रावती शहरालगतच्या अय्यप्पा मंदिर भागात वनविभागाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी लाऊन ठेवलेल्या पिंजऱ्यात शनिवार १ एप्रिलला पहाटे बिबट जेरबंद झाला. या घटनेची माहिती आयुध निर्माणी प्रशासनाने वन विभागाकडे दिली असता, सदर बिबट्याला वसहतीपासून गंधा नाला नर्सरीमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून पिपरबोडी व आयुध निर्माणीच्या वसाहतीत धुमाकूळ घालून बिबट्याने चार ते पाचजणांना जखमी केले होते. वनविभागाने परिसरात पिंजरे लावले होते. अखेर १ एप्रिलच्या पहाटे बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या अंदाजे दीड वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाने दिली.

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे, क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, वनरक्षक धनराज गेडाम व चमूनी केली. आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक विजयकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने